विद्यार्थ्यांनी करिअरसाठी भारतीय पोलीस सेवेस प्राधान्य द्यावे- उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा

करमाळा, दि. (करमाळा-LIVE)-
सोलापूर जिल्हा पोलिस प्रशासन अंतर्गत, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, करमाळा व यशकल्याणी सेवाभावी संस्था पूणे यांचे संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील निवडक शाळांतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यशकल्याणी सेवा भवन करमाळा येथे शालेय चित्रकला व निबंध स्पर्धा पारितोषीक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत दोन हजार हून अधिक विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपविभागीय पोलिस अधिकारी, आयपीएस अंजना कृष्णा बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की करिअर साठी अनेक क्षेत्रांचा पर्याय असताना देखील भारतीय पोलिस सेवा क्षेत्राचा प्रामुख्याने विचार करायला हवा. विशेषतः अनेक मुलींना पोलीस सेवेची आवड असते. बुद्धीमत्ता असते परंतू पालकांशी सुसंवाद नसल्याने पोलीस क्षेत्र करीअरसाठी निवडले जात नाही. आजही पोलीस अधिकारी म्हणून केवळ बारा टक्के एवढेच मुलींचे प्रमाण या क्षेत्रात आहे. जे तूलनेने खूप कमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी मुलींनी आपणास निःसंकोचपणे संपर्क करण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविक यशकल्याणी संस्येचे अध्यक्ष प्रा. गणेश करे- पाटील यांनी केले. ते म्हणाले की, सद्यस्थितीत अनेक आव्हानांना सामोरे जाताना पोलीसांची जबाबदारी वाढलेली आहे.
पोलीस दलाची प्रतीमा अधिक चांगली होण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असून पोलिसांबद्दल विश्वास वृध्दींगत होण्यासाठी या विभागाने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा. अशा उपक्रमांसाठी यशकल्याणी संस्थेच्या वतीने विशेष सहकार्य केले जाईल अशी उपविभागीय पो. अधिकारी अंजना कृष्णा यांना ग्वाही दिली व एपीआय गिरीजा म्हस्के तसेच निर्मया पथक पो. जवान संभाजी पवार व सहकारी यांनी या स्पर्धेच्या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल कौतुक केले.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रचिती पुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर भाष्य करत समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असून नीतिमान समाज घडविण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सहा. पो.निरीक्षक गिरीजा म्हस्के यांनीही मनोगत व्यक्त केले पोलिस विभागासह यशकल्याणी संस्थेस धन्यवाद दिले.
सूत्रसंचालन प्रा.विष्णू शिंदे यांनी केले तर आभार पो.कॉ.गणेश गुटाळ यांनी मानले. यावेळी विजय खाडे सर दत्तात्रय मोहोळकर सर, लक्ष्मण भोसले सर,सुनील तोरमल सर आप्पासाहेब वाघमोडे यांनी परिश्रम घेतले
पुढीलप्रमाणे मान्यावरांचा झाला सन्मान-
सहा. पो. अधिक्षक मा. अंजना कृष्णा व्ही.एस.( महिला आयपीएस. ),
सहा. पो.निरीक्षक गिरीजा मस्के , निर्भया पथकाचे पो.कॉ. संभाजी गुंडीबा पवार
पो.कॉ. गणेश रामचंद्र गुटाळ , म.पो.कॉ. विद्या नामदेव इंगोले
,पो. कॉ. मनजीत संजय भोसले ,
पो.कॉ सनी रावसाहेब सातव
जिल्हाध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड,
( इंग्रजी भाषा कौशल्य विकास ) प्रा. कल्याणराव साळुंके, ( पक्षी अभ्यासक )
प्रा. जयेश पवार, ( जीवन शिक्षण आणि टेक्नोसोलूशन्स )
प्रा.विष्णू शिंदे, ( विज्ञान विषयक उपक्रम)
अतुल दाभाडे,
( जलसंपदा विभाग)
प्रा. निवृत्ती बांडे, ( शैक्षणिक)
तालुकास्तरीय शालेय विद्यार्थी चित्रकला व निबंध स्पर्धेतील गट व प्रकारानुसार
तालुकास्तरीय विजेते
निबंध स्पर्धा. ( 8 ते 10 वी)
1) कु वैष्णवी प्रवीण पवार इयत्ता 9 वी दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय कुंभेज
2) कु ज्ञानदा ज्ञानेश्वर घाडगे इयत्ता 8 वी नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे
3) कु वैष्णवी शिवाजी राऊत इयत्ता 9 वी श्रीमती रमाबाई बाबुलाल सुराणा विद्यालय चिखलठाण
उत्तेजनार्थ
निबंध स्पर्धा ( 8 वी ते 10वी)
1) आर्यन किशोर गुळमे
इयत्ता 10 वी
भारत हायस्कूल जेऊर
2) कु हर्षाली हनुमंत ढेरे
इयत्ता 10 वी
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट
3) कु .प्रतिज्ञा प्रताप भोसले
इयत्ता 8 वी
नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल करमाळा
चित्रकला स्पर्धा ( 5 वी ते 7 वी )
1) ईशान इसाक शेख इयत्ता 7 वी वामनराव बदे विद्यालय उमरड
2) कु जकिया मतीन शेख इयत्ता 7 वी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट
3) कु आरोही प्रभाकर जाधव इयत्ता 6 वी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट
उत्तेजनार्थ
चित्रकला स्पर्धा ( 5 वी ते 7 वी)
1) कु अनुष्का मारुती बोराटे इयत्ता 7 वी नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे
2) कु स्नेहल वसंतराव राऊत इयत्ता 7 वी नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे
3) कु स्वरा चिंतामणी कुंभार इयत्ता 7 वी गुरुकुल पब्लिक स्कूल पांडे