जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप

चिखलठाण, दि. २० (करमाळा-LIVE)-
एक वर्षापूर्वी वर्गातील मुलांनी केलेल्या खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जेऊर येथील ओंकार पोळ याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त करमाळा व केम येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन तर शेटफळ येथील जिल्हा परिषद शाळेत पोळ परिवारातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
शेटफळ येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपवेळी सुरवातीला प्रास्ताविक उपक्रमशील शिक्षक महेश दगडे यांनी केले. नंतर सर्व शालेय विद्यार्थ्यांना वही पेन अशा शालेय सापरिसरातील हित्य ही वाटप करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे व जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ महेश घोगरे, संदीप पोळ, अतुल पोळ, शिवराज पोळ, गजेंद्र पोळ मुख्याध्यापक शिवाजी शिंदे शिक्षक बिजू रणसिंग धनाजी गायकवाड यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
/https://karmalalive.in/karmala-jeur-shetphal-gajendra-pol-article-regarding-onkar-pol/
बारामती येथे बारावी मध्ये शिकत असलेल्या जेऊर येथील ओंकार पोळ याच्या खुनाच्या घटनेच्या एक वर्षानंतरही आरोपी मोकाट असून हा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी ओंकारचे चुलते संदीप पोळ यांनी केली आहे.