सोगावं येथील तरूणी जेऊर रेल्वे स्टेशनवरून बेपत्ता
जेऊर, दि. २४ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील सोगावं येथील एक तरूणी जेऊर रेल्वे स्टेशनवरून बेपत्ता झालेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्वेता नवानाथ पवार (वय- २०) ही तरूणी सोमवार २० आॕक्टोबरला दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास जेऊर रेल्वे स्टेशनवरून बेपत्ता झालेली आहे.
सदरील मुलगी कोणाला आढळल्यास कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस कार्यालयाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हवलदार भाऊसाहेब लोंढे करीत आहेत.

