August 23, 2026

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत कुंभेजच्या बागल विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

0
IMG-20260823-WA0010.jpg

बागल विद्यालयास ‘नशामुक्त शाळा‘ हे प्रमाणपत्र प्रदान ..

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-

प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, माउंट अबू या मुख्यालयांतर्गत जेऊर ता . करमाळा येथील सेवाकेंद्र प्रभारी बी के सिस्टर अश्विनी यांनी दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय, कुंभेज येथे विद्यार्थ्याना नशामुक्त भारत अभियान अंतर्गत मार्गदर्शन केले. व शपथ दिली.

सद्यस्थितीत तरुणांमध्ये व्यसनांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणारे मानसिक, शारीरिक,आर्थिक नुकसान आणि परिणामी नैराश्य वाढत आहे. हे गंभीर परिणाम टाळण्यासाठी व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.व सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत ची शपथ दिली. यावेळी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री हनुमंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

आपल्या मनोगतामधून त्यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त जीवनाचे फायदे जाणून घेऊन कोणत्याही व्यसनांपासून स्वतः दूर राहण्याचा व आपल्या नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना व्यसनमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन करत भारताला अधिक सशक्त करण्याचा प्रेरक संदेश दिला. ब्रम्हकुमारीज विश्वविद्यालयातर्फे बागल विद्यालयास ‘नशामुक्त शाळा‘ हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले . मुख्याध्यापक श्री.हनुमंत पाटील यांनी ते प्रमाणपत्र आपल्या शिक्षक स्टाफसह स्वीकारले.

यावेळी बी के अश्विनी यांच्यासह विजया बहन तसेच शिक्षक कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, दादा जाधव यांच्यासह सेवक किशोर कदम, संतोष घोरपडे, नंदकुमार कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सिताराम बनसोडे यांनी तर उपस्थितांचे आभार श्री. कल्याणराव साळुंके यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page