08/06/2025

लहानापासून मोठ्यांपर्यंत, मुंबईपासून ते नागपूरपर्यंत, चांदयापासून बांध्यापर्यंत आणि मुंबईपासून ते मांगीपर्यंत सर्वांचेच स्व.दिगंबरराव (डिगा मामा) बागल प्रिय होते

0
images-51.jpeg

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)-
लहानापासून मोठ्यांपर्यंत, मुंबईपासून ते नागपूरपर्यंत, चांदयापासून बांध्यापर्यंत आणि मुंबईपासून ते मांगीपर्यंत सर्वांचेच प्रिय असणारे म्हणजेच स्व.दिगंबरराव बागल उर्फ डिगा मामा होय.

करमाळा तालुक्याचे भाग्यविधाते, हरितक्रांतीचे प्रणेते, माजी राज्यमंत्री, स्व डिगा मामा तालुक्यातील जनतेचे नेते होते आणि त्यांच्या कार्यामुळे ते लोकनेते झाले. करमाळा तालुक्याला स्व. दिगामामांच्या रूपाने मंत्रीपदाची संधी मिळाली. वास्तविक पाहता तालुक्याचे एक धडाडीचे नेते होते राजकीय विचार करता मामांनी संपूर्ण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनावर राज्य केले. विरोधकांनाही मामांनी आपल्या वागण्यातून व आपुलकीने आपलेसे केले होते. विरोधकांच्या योग्य व विधायक कामांना त्यांनी न्याय दिला. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जनसेवाच केली.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=526542286184299&id=100064855969729&mibextid=Nif5oz मकाई चे चेअरमन दिग्विजय बागल यांची पोस्ट.

https://www.facebook.com/digvijaybagal4youth?mibextid=ZbWKwL

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page