मच्छिंद्र नुस्ते विद्यालय पांगरे: ग्रामीण भागातील क्रीडा स्पर्धा खेळाडूंना प्रेरणादायी-प्रा.सुनील भांगे


करमाळा, दि. 15 (करमाळा-LIVE)-
कविटगावं-पांगरे सारख्या ग्रामीण भागात जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित होणे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणादायी असून अशा स्पर्धा पाहून अनेक उत्कृष्ट खेळाडू निर्माण होऊ शकतात असे प्रतिपादन कंदर ग्रामविकास मंडळाचे सचिव व कन्व्हमुनी ज्युनिअर कॉलेज चे प्रा.सुनील भांगे यांनी केले.
जिल्हा क्रीडा कार्यलय सोलापूर अंतर्गत आणि मच्छिंद्र नुस्ते विद्यालय कविटगावं येथेआयोजित केलेल्या जिल्ह्यास्थरीय शालेय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते, यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र मल्लखांब असोसिएशनचे सहसचिव पांडुरंग वाघमारे, नुस्ते विद्यालय याचे अध्यक्ष मच्छिंद्र नुस्ते, कंदर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पवार, क्रीडा अधिकारी मोरे साहेब उपस्थित होते.
या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील एकवीस संघ सहभागी झाले असून स्पर्धा दोन दिवस चालणार आहे. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पंच म्हणून बाळासाहेब शिंदे, जेऊर हनुमंत खंडजोडे, सातारा उमेश झोटिंग, अहमदनगर कुमारी ऋतुजा गीते आदी काम पाहणार असून स्पर्धेचे नियोजन संतोष नुस्ते हे करित आहेत.

