08/06/2025

नाद करायचा नाय.! ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सोशल मिडीयावर आबा-मामा यांचे व्हिडीओ व्हायरल

0
IMG-20221221-WA0011.jpg

करमाळा, दि. 21 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली असून दोन ग्रामपंचायत अगोदरच बिनविरोध झाल्यामुळे 28 ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली यात पाटील गटाने एकोणीस, शिंदे गटाने पंधरा तर बागल गटाने अकरा ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.

तिन्ही गटाने वेगवेगळे दावे जरी केलेले असले तरी कार्यकर्ते मात्र जाम खूष असून कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सोशल मिडीयावर माजी आमदार नारायण आबा पाटील आणि विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचे जुने व्हिडीओ व्हायरल झालेले असून व्हायरल व्हिडीओ मुळे करमाळ्याचे राजकारण निघाले ढवळून निघालेले असून आता विधानसभेची बारी असा नारा दोन्ही गटाकडून दिला जात आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर व्हायरल झालेला व्हिडीओ पहा

माजी आमदार नारायण आबा पाटील

आमदार संजयमामा शिंदे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page