फिसरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शिंदे गटाचे विजय अवताडे यांची बिनविरोध निवड
करमाळा, दि. 31 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील फिसरे येथील आमदार संजयमामा शिंदे गटाचे उपसरपंच संदिप नेटके यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवड आज निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक केवारे भाऊसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
उपसरपंच पदासाठी विजय अवताडे यांचा एकच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध उद्योजक भरत अवताडे, सरपंच प्रदीप दौंडे, रामचंद्र पवार, माजी उपसरपंच संदीप नेटके, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत रोकडे, गणेश ढावरे, प्रशांत नेटके, नागनाथ काटे, नागेश काटे, संतोष नेटके, मेजर सुनील दौंडे, सुमित अवताडे, घनश्याम पाटील, सुनील नेटके, कृष्णा ढावरे, सुंदर नेटके, विश्वास मस्तुद, ज्ञानेश्वर चाळक, विनोद नेटके, शहाजी रोकडेआदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपसरपंच विजय अवताडे यांचा सत्कार मेजर सुनील धोंडे यांच्या हस्ते करण्यात आला. विजय अवताडे यांच्या निवडीबद्दल करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, भैरवनाथ शुगर चे कार्यकारी संचालक किरण तात्या सावंत यांनी अभिनंदन केले.