10/06/2026

सोलापूरातील विवेकानंद पब्लिक स्कूल मध्ये क्रीडा महोत्सव साजरा

0
IMG_20230101_010324.jpg

सोलापूर, दि. 1 (करमाळा-LIVE)-
सोलापूरातील विवेकानंद पब्लिक स्कूल मध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित विवेकानंद पब्लिक स्कूलच्या वतीने जर वर्षी प्रमाणे यावर्षीही क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून योग प्रशिक्षिका संगीता जाधव उपस्थितीत होत्या. यावेळी संस्थेच्या संचालिका संगीता सारडा, मुख्याध्यापिका सपना आसावा, क्रीडा शिक्षक विठ्ठल वाघचवरे तसेच पालक उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता सारडा, मनिषा जगताप, ओंकार कुलकर्णी यांनी केले तर आभार मनाली शाह यांनी मानले.

क्रीडा महोत्सवात शाळेतील नर्सरी ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला तर पालकांची उपस्थिती देखील चांगली होती. क्रीडा स्पर्धेत जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02Giky942PApBGXft9izBh9vRh67WE7KRPAGtFoGGG7cEAHt7c8D7uJn4ZY1anHkh6l&id=100066460902032&mibextid=Nif5ozफेसबुक लिंक

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page