जेऊर येथील भोसले गुरूजी यांचे निधन

जेऊर, दि. 1 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण बळी भोसले उर्फ भोसले गुरूजी (वय 80) यांचे दीर्घ आजाराने आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा दीपक, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. भोसले गुरूजी या नावाने ते परिचित होते.

