करमाळा: काँग्रेस ओबीसी सेलच्या तालुका उपाध्यक्ष पदी मेहबुब शेख यांची निवड

जेऊर, दि. 2 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुका काँग्रेस ओबीसी सेलच्या तालुका उपाध्यक्ष पदी कोंढेज येथील मेहबुब शेख यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबतचे पत्र काँग्रेसचे ओबीसी सेलचे करमाळा तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख यांनी दिले आहे. उल्लेखनीय काम केल्याबद्दल ही निवड करण्यात आलेली असून निवडीबद्दल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

