08/06/2025

बुधवारी जेऊरच्या भारत शैक्षणिक संकूलाचे 63 वे वार्षिक स्नेहसंमेलन

0
IMG-20230102-WA0036.jpg

जेऊर, दि. 3 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत शैक्षणिक संकूलाच्या वतीने 63 व्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दि. 4 जानेवारी रोजी दुपारी 2.00 वाजता स्नेहसंमेलन होणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

स्नेहसंमेलनाला प्रमुख प्रवक्ते म्हणून शिक्षण विभागाचे माजी सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ उपस्थितीत राहणार असून स्नेहसंमेलन अध्यक्ष पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ सुभाष सुराणा उपस्थितीत राहणार आहेत.

बुधवारी 4 जानेवारीला दुपारी 2.00 वाजता माजी विद्यार्थी मेळावा तसेच पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. गुरूवारी 5 जानेवारी दुपारी 2.00 वाजता कलापथकाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नारायण पाटील, प्राचार्य केशव दहिभाते, प्राचार्य अनंत शिंगाडे आणि मुख्यध्यापक दीपक व्यवहारे यांनी दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page