स्नेहालय इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-
करमाळ्यातील स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन करमाळा पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या हस्ते झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहालय स्कूलचे संस्थापक जयंत दळवी, प्रमुख उपस्थिती गटविकास अधिकारी मनोज राउत, माजी नगरसेवक डॉ श्रीराम परदेशी, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, दुध संघाचे माजी संचालक राजेंद्रसिंह भोसले, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, माजी नगरसेवक कमलाकर वीर, संचालक रामचंद्र दळवी, सागर दळवी आदि उपस्थित होते.
प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, राजमाता जिजाऊ, नेताजी सुभाषचंद्र बोस, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले होते. त्यानंतर गणेशाच्या गीताने सुरुवात करण्यात आली होती तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, यांच्यावर तसेच देश भक्ती गीते आणि विविध सिनेमातील गीतांवर भरदार नृत्य विद्यार्थ्यांनी केले.
यावेळी मार्गदर्शक संचालक रामचंद्र दळवी, सुमन दळवी, द्रौपदी वाघमारे, मंजुळा वाघमारे, सुलोचना दळवी उपस्थित होते. मकाईचे माजी संचालक सुर्यकांत पाटील, नेते अरुण जगताप, नारायण पवार, रोशेवाडीचे सरपंच यशपाल कांबळे, मेस्टा एफ संघटनेचे उपाध्यक्ष नितीन भोगे, स्वाती बिले, एलिझाबेत आसादे, मधुरा जगताप, ज्योती मुथा, ज्योती पांढरे, भावना गांधी तसेच पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका धनश्री जयंत दळवी, सीमा कोरडे, हेमा शिंदे, शिवांगी कांबळे, कोमल बत्तीसे, पल्लवी माळवे, शुभांगी खळदकर, अंजूम कांबळे, फरहाना खान, सविता पवार, रोहिणी गरड, श्रद्धा गांधी, कृष्णा पवार, राहुल पलंगे, बाबा तांबोळी, अंकुश माळी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेच्या सचिव धनश्री दळवी यांनी केले तर सूत्रसंचालन शेखर जोगळेकर यांनी तर आभार स्नेहालय स्कूलचे संस्थापक जयंत दळवी यांनी केले.

