जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पारंपारिक पध्दतीने मिरवणूक


जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)-
संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने जेऊर येथे शिवजयंती मिरवणूक सोहळा धुमधडाक्यात उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.
प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार विधवा माता व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या 500 गाथा माता-भगिनींना वाटप करण्यात आले.
यावेळी मुला-मुलींनी व महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले व माता रमाई यांची वेशभूषा परिधान करून या रणरागिनी घोड्यावरती स्वार झाल्या महाराष्ट्राचे परंपरा असणारी संतांची भूमी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणूक सोहळ्यामध्ये टाळ विना मृदंग याचा मोठ्या जोशामध्ये आवाज करून व अभंग जाऊन वारकरी धर्माची परंपरा जोपासली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसाठी रथाची खूप आकर्षक अशी सजावट केली होती व रथामध्ये विविध कलरची लाईटची रोशनी होती व रथाच्या समोरील बाजूस मावळ्यांची वेशभूषा करून मावळा ग्रुप होता व मिरवणुकीस शेटफळ नागोबाचे येथील लेझीम पथक मिरवणूकीचे आकर्षक ठरले. योद्धा करिअर अकॅडमी झरे येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती लेझीम खेळून मिरवणूकीचे आकर्षण केले.
मिरवणूक आकर्षण-
1) शेटफळ येथील सर्व ग्रामस्थ मुलांचे लेझीम पथक
2) योद्धा करिअर अकॅडमी झरे 60 मुला-मुलींचे लेझीम पथक
3) जगदंब जिजाऊ प्रतिष्ठान 60 मुलींचे ढोल पथक सोलापूर
4) श्री संत हरी हरी बाबा वारकरी शिक्षण संस्था कोर्टी 50 मुले यांची पायी वारी
5) शिवनेरी मर्दानी आखाडा व झांज पथक 50 करकंम
6) शिवरत्न मर्दानी आखाडा 30 करकंम
7) स्वराज्य मर्दानी खेळ 30 केम
8) बाबुळगाव येथील हलगी पथक
9) छत्रपती मर्दानी आखाडा करकंम
10) मावळा ग्रुप अकलूज
11) जेऊर येथील हलगी पथक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणूकीच्या कार्यक्रमांमध्ये कलाकारांनी आपली उत्कृष्ट अशी कला सादर केली. जेऊर मध्ये सर्व चौकामध्ये लाईटचे व्यवस्था ग्रुपच्या वतीने करण्यात आली होती जेऊर मधील सर्व माता भगिनी व जेऊर येथील मुस्लिम समाज व सर्व जाती धर्मातील समाज बांधव व माता-भगिनी मोठ्या संख्येने व कुटुंबासहित व करमाळा तालुक्यातील शिवप्रेमी व पदाधिकारी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

