October 12, 2026

जागतिक महिला दिनाच्या दिवशी सन्मान: घारगावंच्या सरपंचपदी पाटील गटाच्या सौ लक्ष्मी सरवदे यांची बिनविरोध निवड

0
IMG-20230308-WA0040.jpg

करमाळा, दि. 8 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील घारगावं ग्रामपंचायतच्या नूतन सरपंचपदी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाच्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

घारगावं ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ८ मार्च रोजी निवडणूक झाली या निवडणूकीत सौ लक्ष्मी संजय सरवदे यांचा यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जगताप-शिंदे गटाचे उपसरपंच सतीश पवार तसेच माजी आमदार नारायण आबा पाटील गटाचे इतर सर्व सदस्य यामध्ये माजी सरपंच लोचना पाटील, ग्रामपंचायत सदस्य कविता होगले, सदस्य आशा देशमुखे ,माजी सरपंच अनिता भोसले, सदस्य दत्तात्रय मस्तुद सर्वजण उपस्थित होते या सर्वांनी सौ लक्ष्मी संजय सरवदे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड केली आहे.

८ मार्च या जागतिक महिला दिना रोजी सरपंच पद निवड घेण्यात यावी अशी लेखी मागणी सर्व सदस्यांनी तहसीलदार समीर माने यांच्याकडे केली त्यानंतर तहसीलदार समीर माने यांनी या निवडीसाठी परवानगी दिली. या सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी अनिल ठाकर यांनी काम पाहिले. सोबत तलाठी मयुर क्षिरसागर तसेच सहाय्यक सोमनाथ खराडे, घारगावचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक रवींद्र काळे भाऊसाहेब यांनी काम पाहिले.

तसेच यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष अॕड शशिकांत नरुटे, माजी सरपंच किरण पाटील, माजी सरपंच कल्याण होगले व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page