जेऊर-शेटफळ-चिखलठाण-केडगावं रस्ता; मी या रस्त्याने रोज जाणारा एक लाचार


जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील उजनी बॕकवॉटर परिसरातील आणि राजकीय दृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या चिखलठाण-शेटफळ-केडगावं गावाला जायला गेली कित्येक वर्षे झाली रस्ता नाही त्यामुळं ‘ढीगभर नेते नावाला, अन् रस्ता नाही चिखलठाण-शेटफळ-केडगावंं गावाला” अशी म्हणायची वेळ गेल्या दहा वर्षांपासून आलेली आहे.
दरम्यान या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येत असून डांबरीकरण कधी होणार याचा काही थांब पत्ता कोणीही सांगू शकणार नाही.
दरम्यान करमाळा तालुक्यातील सोशल मिडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल झालेली असून या पोस्ट मध्ये चिखलठाण रस्त्याची व्यथा मांडली आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेली पोस्ट पुढीलप्रमाणे-
जेऊर चिखलठाण रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
करमाळा तालुक्यातील जेऊर ते चिखलठाण हा असा रस्ता आहे ज्याचे गेल्या दहा वर्षांपासून कधीही चांगले डांबरीकरण झाले नाही.या भागातील लोकांनी आसे काय पाप केले असेल देव जाणो. वर्षातून एकदा नाही तर दोनदा आशा प्रकारे माती मुरूमाने खड्डे बुजवून रडणाराचे डोळे पुसण्याचे काम केले जाते.या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वहाने चालवणे अवघड झाले आहे.लोकांना मनक्याचे विकार जडले आहेत.या भागातील शेतातील माल घेण्यासाठी व्यापारी रस्त्यामुळे येत नाहीत. कुगाव पासून जेऊर पर्यंत वहानांना एक तास लागतो.आशा परिस्थितीत सिरियस पेशंटला तातडीच्या उपचारासाठी या रस्त्याने कसे घेऊन जायचे . या परिस्थितीला जबाबदार कोण?……. या भागातील स्वतः ला मोठे नेते म्हणून घेणारी मंडळी मोठमोठ्या गप्पा मारतात पण दहा वर्षांत रस्ता होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे…. केडगावला जाणारा रस्ता तर विचारायलाच नको या रस्त्याचे मागील दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले होते ते कसे केले त्या बिचाऱ्या कंत्राटदारालाच माहीत.या परिसरातील लोक सोशीक नाही तर लाचार आहेत त्यांच्यात अधिकारी,लोकप्रतिनिधी किंवा कंत्राटदाराला जाब विचारण्याची हिंमत नाही…… .जर कोणी तसा प्रयत्न केला तर त्याला कोणी साथ देत नाहीत……… नेते मंडळी काही बोलत नाहीत आणी आपल्या नेत्यांना दुखावण्याची ताकद कोणामध्ये नाही…… बाहेर गावातील पाहूणे मंडळी या रस्त्यामुळे येथिल लोकांना टोमणे मारतात त्यांना प्रश्न पडतो रस्ते इतके खराब असताना कोणी कसे काही बोलत नाही….. या लोकांना काहीच कसं वाटत नाही ……
……..🙏.मी या रस्त्याने रोज जाणारा एक लाचार…

