जेऊर : आमदार संजयमामा शिंदे आणि कृषीरत्न आनंद कोठडीया यांची भेट; केळी संशोधन केंद्राची मागणी मार्गी लावण्याचा दिला विश्वास


जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी आज जेऊर येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद कोठडीया यांची सदिच्छा भेट घेऊन तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली.
शेलगाव (वां) येथे केळी संशोधन केंद्राच्या मागणीसाठी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा व तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या दहिगावं उपसा सिंचन योजनेसाठी निधी मंजूर झाला असून या योजनेचे शंभर टक्के काम एका वर्षभरात पूर्ण करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला सुरवातीला जेऊर येथील व्यापारी अभयशेठ लुंकड यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी कृषीरत्न आनंद कोठाडिया यांचा सन्मान आमदार संजयमामा शिंदे यांनी केला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रहास निमगीरे, माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी, सुजीत बागल, निळकंठ अभंग, उमेश पाथ्रुडकर किरण डोके, विजय लबडे, नानासाहेब साळुंके, बालाजी गावडे यांच्यासह लोकविकास संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

