17/12/2024

संगोबा येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे

0
IMG-20230527-WA0057.jpg

करमाळा, दि. 27 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील संगोबा येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे अतिशय निकृष्ट व चुकीच्या पध्दतीने काम चालू असून बंधाऱ्याच्या खालच्या बाजूने सोलिंगचे काम करताना कोणत्याही प्रकारची खोदाई केलेली नाही. याउलट तिथे दगड न टाकता फक्त माती व इतर नदी मधीलच मानाड उकरुन त्यात भरले आहे.

तसेच बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस भिंत बांधायची म्हणून मोठ-मोठे खड्डे खोदून अर्धवट काम ठेवले आहे. जर पाऊस झाला तर 1998-1999 मध्ये ज्या प्रकारे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजू वाहून गेल्या होत्या तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 55 ते 60 लाख रुपयाचे काम चालू असताना पाटबंधारे खातेचे एकही कर्मचारी अथवा काॕलिटी कंट्रोल कर्मचारी येथे उपस्थित नाही. शासनाने लाखो रुपयाचे काम मंजूर केले. मात्र येथे काम चालू आहे अशी साधी पाटी/ बोर्ड लावण्यात आला नाही. हे काम बंद करून जर मंजूर प्लॅन इस्टीमेंट नुसार चालू नाही केले तर संगोबा येथे रास्ता रोको व तहसिल कार्यालय करमाळा व करमाळा पाटबंधारे प्रशासनावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा तालुकाध्यक्ष शशिकांत नरुटे व संगोबा बंधारा लाभधारक शेतकरी वर्गाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page