10/06/2026

केत्तूर-१ येथील जिल्हा मार्ग फोडला; ग्रामस्थांकडून तक्रार दाखल

0
IMG-20230704-WA0043.jpg

करमाळा, दि. 5 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील केत्तूर-१ ते केत्तूर-२ हा जिल्हा मार्ग क्र. 125 हा सार्वजनिक बांधकामकडे वर्ग असलेला रस्ता फोडल्याची तक्रार केत्तूर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभागाकडे दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, जल जीवन मिशन अंतर्गत केत्तूर-१ साठी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन चालू करण्यात आली आहे. परंतु संबंधित ठेकेदार याने जाणून बुजून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग असलेला रस्ता पोखलेन मशीन ने फोडला आहे. व रस्त्यातून पाईप लाईन चारी चालू केली होती. परंतु ग्रामस्थांनी सदर चारी बंद करून संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवली आहे.

केत्तूर-१ ते केत्तूर-२ हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजने कडे वर्ग झाला असून भविष्यात या रस्त्याचे रूंदीकरण होणार. या आगोदर संबंधित ठेकेदारास तोंडी सांगतले होते. तरीही रस्ता फोडला आहे. या बाबत वरीष्ठ अधिकारी यांच्या कडे तक्रारी नोंदवल्या आहेत. तक्रारी ची योग्य ती दखल न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय येडे यांनी सांगितले आहे.

तक्रार पत्र

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page