August 27, 2026

आजचे पंचांग 16 जुलै 2023; पहा शुभ मुहूर्त, शुभ योग आणि राशी भविष्य

0
images-20-1.jpeg

जेऊर, दि. 16 (करमाळा-LIVE)-
आषाढ २५ शके १९४५
दिनांक :- १६/०७/२

शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति २२:०९,
नक्षत्र :- आर्द्रा समाप्ति २६:३९,
योग :- ध्रुव समाप्ति ०८:३२,
करण :- विष्टि समाप्ति ०८:३२,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – पुनर्वसु,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- रवि – कर्क २९:०६,
शुभाशुभ दिवस:- चतुर्दशी वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- संध्या. ०५:३० ते ०७:०८ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:१९ ते १०:५७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५७ ते १२:३५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:१३ ते ०३:५२ पर्यंत,

❀ दिन विशेष:
संत सावतामाळी पु.ति., रवि कर्क २९:०६, मु. ४५ समर्घ, भद्रा ०९:१८ प.,
————–

मेष
आज दिवस मजेत घालवा .राशीतील गुरू प्रसिद्धी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व देतील. घरामध्ये सत्संग घडेल. भावंडांची जबाबदारी पार पाडाल. कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस.

वृषभ
व्यय राहू गुरू द्विधा मनस्थिती निर्माण करेल . काही आनंदाचे प्रसंग देखील येतील .खुश रहा. कार्यालयीन कामा निमित्त प्रवास , नातेवाईक भेट संभवते. घरात विशेष घटना घडतील. आर्थिक लाभ होतील . दिवस सुखद.

मिथुन
राशीस्थानात चंद्र आहे. काही कारणाने तणावात टाकणारे वातावरण आहे. चूक होऊ शकते. कार्य करताना विचार करा. संतती आनंदी राहील. व्यवसाय आणि आर्थिक दृष्ट्या बरा दिवस.

कर्क
दशम गुरू आणि चंद्र राशीस्थानात नोकरीत आर्थिक विकास करेल. वैवाहिक जीवन जपुन राहण्याचे संकेत आहे. व्यवसायात लाभ होईल. घरामध्ये प्रकृती जपून काम करा..दिवस बरा .

सिंह
आर्थिक दृष्ट्या दिवस मध्यम आहे. गृह सौख्य मिळेल. भाग्य स्थानातील ग्रह प्रत्येक गोष्टीत साथ देतील. सप्तम शनी आणि राशीतील मंगळ वैवाहिक जीवनात ताण निर्माण करेल. योगायोगाने कोणी मोठी व्यक्ती भेटेल. कौटुंबिक दृष्ट्या दिवस साधारण.

कन्या
समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. चंद्र नातेवाईक भेट घडवून आणेल. तसेच आर्थिक लाभ होतील. प्रवास योग येतील. जोडीदाराच्या आरोग्या संबंधी काळजी घ्या. दिवस उत्तम.

तुला
शुक्र घरामध्ये आवश्यक वस्तूंची खरेदी करील. खर्च भरपूर होईल पण नवीन संधी मिळतील . जबाबदारी येईल. जोडीदाराच्या आयुष्यात अनेक बदल होतील. संतती कडे लक्ष द्या . प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.

धनू
गुरू राहू घर आणि वाहन या बाबतीत अडचणी आणील.. पंचम गुरू व अष्टम चंद्र योग घडामोडी निर्माण करणार आहे. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल . लिखाण मध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होतील . व्यवसाय नोकरी साठी मध्यम दिवस.

मकर
राशीच्या षष्ठस्थानात चंद्र नवीन संधी प्राप्त करून देईल. संततीची उत्तम प्रगती होईल. मित्र भेट संभवते. खर्च जपून करा.घरामध्ये पाहुणे येतील. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस शुभ.
बायको सारखी भांडते? प्रत्येक नवऱ्याने लक्षात ठेवाव्यात या गोष्टी

कुंभ
राशीतील शनी आणि धनदायक चंद्र शुभ असून व्यवसायात जपून असा असे संकेत देत आहे. सप्तम मंगळ शुक्र नाते संबंध ताणलेले असून सामाजिक जीवनात कष्ट देईल.. दिवस बरा.

मीन
राशी स्वामी शुभ आहे. गुरू उपस्थिती मुळे सामाजिक,आर्थिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. अध्यात्मिक अनुभव येतील.प्रवास,बंधुभेट संभवते. दिवस मध्यम.

वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत (देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
📞 8411935533
9561947533

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page