झरे येथे जनजीवन मिशन योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भूमिपुजन



करमाळा, दि. 16 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील झरे येथे जनजीवन मिशन योजनेतंर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जि.प.सदस्य उध्दव माळी, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष प्रशांत पाटील, झरेच्या सरपंच सुनिता कांबळे, माजी सरपंच सदस्य सुनिताताई पाटील, उपसरपंच मैनाताई घाडगे, ग्रा.पं.सदस्य मच्छिंद्र घाडगे, भारत मोरे, मयुर मुसळे, बबन घाडगे, बापूसाहेब मोरे, पोपट आमृळे, रंगनाथ जाधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकामध्ये प्रशांत पाटील यांनी दहिगावं उपसा सिंचन योजनेमध्ये झरे गावाचा समाविष्ट करण्यात यावा ही प्रमुख मागणी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे मांडली यावेळी झरे ग्रामस्थांना आमदार शिंदे आश्वासित केले की, दहिगाव उपसा सिंचन चे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर झरे गावाचा योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल असे सांगितले.

