08/06/2025

करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या तीन प्रमुख जिल्हा मार्गांना राज्य मार्गाचा दर्जा द्या- मकाईचे संचालक सतिश नीळ यांची मागणी

0
IMG-20230718-WA0039.jpg

करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कुंभेजफाटा-पारेवाडी-जिंती चौक ते डिकसळ ते भिगवण तसेच
कुगावं-शेटफळ-जेऊर-साडे.
व कोळगावं-निमगावं(ह)-वरकुटे-
घोटी-ते जेऊर हे तीन प्रमुख जिल्हा मार्गांना राज्य मार्गाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश नीळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पुणे, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यांना जोडणारे हे प्रमुख मार्ग आहेत. त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. हे मार्ग सीना-कोळगाव व उजनी लाभ क्षेत्रालगत असल्यामुळे परिसरात ऊस, केळी, पपई सह ईतर अन्य फळ पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे हा परिसर फ्रुट व शुगर बेल्ट म्हणून ओळखला जातो तसेच या परिसरात आठ ते दहा साखर कारखान्यांची ऊस वाहतूक याच मार्गावरून होते. या परिसरातील समृद्धीसाठी कृषि क्षेत्राला व्यवसायिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी व विस्तिर्ण उजनी जलाशयातील पक्षी निरीक्षण, कृषी पर्यटन,मत्सअभ्यास केंद्र, वनस्पती अभ्यास केंद्र, नौकाविहार,जलपर्यटनाला चालना देण्यासाठी या मार्गाला राज्य मार्गांना दर्जा देऊन विकसित करणे गरजेचे आहे. आपण या मागणीचा विचार करुन राज्य मार्गाचा दर्जा देण्यात यावा. सदर निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा, कार्यकारी अभियंता अकलूज, अधिक्षक अभियंता सोलापूर यांना देण्यात आल्या आहेत.

करमाळा तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, सिंचन, आरोग्य
रखडलेली औद्योगिक वसाहत, मांगी तलाव, जातेगाव-टेंभुर्णी रस्ता, पुनर्वसनाचे रखडलेल प्रश्न, नविन शर्त व देवस्थान जमिनीचे प्रश्न,रेल्वे संदर्भातील प्रश्न, गायरान जमीन अतिक्रमण, केळी संशोधन केंद्र,लघू पशू चिकीत्सालय, बस स्थानक अशा विविध समस्यांबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडे बागल गटाचे नेते,प्रमुख पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पुढील महिन्यात करमाळा तालुक्यातील शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती नीळ यांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page