07/06/2025

जल जीवन मिशन योजना : भिवरवाडी येथे ग्रामसभा ठराव असतानाही अनाधिकृत जागेत विहीर खोदकाम सुरू ; अनाधिकृत खोदकाम थांबवा- युवानेते अमरसिंह आरकिले यांची मागणी

0
IMG_20230730_143317.jpg

जेऊर, दि. 30 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील भिवरवाडी ग्रामपंचायतने जल जीवन योजना मिशन अंतर्गत पाणीपुरवठा विहीर खोदकाम करून नये असा ठराव ग्रामसभेत असताना विहीर खोदकाम सुरू केले आहे ते तुरंत थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भिवरवाडी येथील युवानेते अमरसिंह आरकिले यांनी दिला आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा विहीर भिवरवाडी गावासाठी मंजूर करण्यात आली आहे. विहीर कोठे खोदायची याबाबत भिवरवाडी ग्रामपंचायतने ग्रामसभा बोलावली होती, या ग्रामसभेत गट क्रमांक 515 ही जागा उजनी जलाशय संपादित असून तसेच हे पाणी जमिनीतून पाजरून विहीर येण्याची शक्यता आहे, सदरील पाणी पिण्यास अयोग्य आहे, सदरील पाणी पिण्यास अयोग्य असून यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच सदर विभागास विहीर खोदकाम करून नये असे वेळोवेळी तक्रारी अर्ज करून ही अधिकारी ग्रामसभेचा अवमान करत स्वतःच्या सोयीनुसार कामकाज करत आहेत. तसेच या जागेत जाण्यासाठी शासकीय रस्ता उपलब्ध नाही तसेच या जागेत जाण्यासाठी खाजगी जागेतून जाण्यासाठी भविष्यात त्या परिसरातील शेतकरी अडथळा आणू शकतात सदरील जागेत विहीर खोदू नये. विहीर खुल्या जागेत खोदावी असा ठराव पास करण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सदर अधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

परंतु भिवरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच तसेच काही ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामसभा ठराव असूनही अनाधिकृत विहीर खोदकाम सुरू केलेले आहे. सदरील खोदकाम तुरंत थांबवण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अमरसिंह आरकिले यांनी निवेदना मार्फत इशारा दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page