08/06/2025

केडगावच्या संत तुकाराम मित्र मंडळाच्या वतीने स्मशानभुमीत वृक्ष लागवड

0
IMG-20230808-WA0071.jpg
ड्राईंग क्लासेस आता जेऊर मध्ये
शिवम प्राईड, शेलगावं

जेऊर, दि. 8 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील केडगाव येथील संत तुकाराम मित्र मंडळ यांच्या तर्फे केडगावं स्मशानभुमी येथे वृक्ष लागवड करण्यात आले.

यावेळी रोहित हायटेक नर्सरी अकोले खुर्द येथील नर्सरी मधील एकूण वीस वृक्षांची लागवड करण्यात आली त्यामध्ये चिंच, करंजा, चेरी, वटवृक्ष, सप्तपर्णी, रेनट्री, बॉटल फोम आदि झाडांची लागवड करण्यात आली.

यावेळी झाडांना पाईप-लाईनची व्यवस्था करून ड्रीप करण्यात आलेले आहे त्याकरिता एकूण 12,000/- रुपये खर्च करण्यात आलेला आहे सदरचा खर्च तुकाराम नगर मित्र मंडळ केडगाव यांनी केलेला असून सदरचे श्रमदानाकरिता शिवाजी पांडुरंग बोराडे, एकनाथ लगस, भैरवनाथ शिनगारे, समाधान शिनगारे, मिलिंद बोराडे, बापू खोलासे, परमेश्वर शिंदे, शंकर वैद्य, नितीन लगस, पांडुरंग फरतडे, राजेंद्र वैद्य व रवी लोकरे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page