18/12/2024

करमाळा एमआयडीसी (MIDC) मधील डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर उगवली झाडे

0
IMG-20230819-WA0071.jpg

करमाळा, दि. 19 (करमाळा-LIVE)-
करमाळा एमआयडीसी (MIDC) सुरू होऊन त्यात उद्योग येणे व तरुणांच्या हाताला काम मिळेल या आशेवर करमाळ्यातील जनता जगत असताना दुसरीकडे मात्र करमाळा एमआयडीसीत निकृष्ट दर्जाची डांबरीकरण व रस्त्याची कामे करून करोडो रुपयांची लूट करून संबंधित खात्याचे अधिकारी व ठेकेदार निघून गेले असल्यामुळे नेमकी ही एमआयडीसी कशासाठी उभा केली आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

करमाळा शहर हद्दीत 47 हेक्टर जमीन घेऊन औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाली आहे या औद्योगिक वसाहतीमध्ये रेखांकन होऊन प्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. या एमआयडीसीला पाणी उपलब्ध नसल्यामुळे मोठे मोठे उद्योजक येत नाहीत. त्यातच ही एमआयडीसी सोलापूर नगर या राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे येथील भूखंडाचे दर सोलापूरच्या एमआयडीसी पेक्षा जास्त आहेत. यामुळे करमाळ्यातील उद्योजक ही हे भूखंड घेत नाहीत.

मात्र दुसरीकडे या एमआयडीसीमध्ये डांबरीकरणाचे काम केल्याचे दाखवून जवळपास तीन कोटी रुपये हडप केल्याची चर्चा सुरू आहे. संबंधित ठेकेदारांनी या एमआयडीसीमध्ये काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून डांबरीकरणाचे काम केले मात्र या डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर झाडे उगवू लागली आहेत. उत्कृष्ट दर्जाची रस्ते व गटारीचे पुलाची कामे केले आहेत. केवळ सहा महिन्यात उभा केलेले पूल पडू लागले आहे. एमआयडीसी बंद असल्यामुळे या रस्त्यावरून अद्याप सुद्धा वाहन गेलेले नाही तरी सुद्धा रस्ता उकडून गेला आहे. केवळ ठेकेदार व भ्रष्टाचारी अधिकारी जगण्यासाठी डांबरी करण्याची कामे करण्यापेक्षा एमआयडीसी ने उजनी धरणातून स्वतंत्र पाईपलाईन द्वारे करमाळा एमआयडीसीत पाणी आणण्यासाठी दहा कोटी रुपये खर्च करावेत व एमआयडीसी सुरू करावी अशी मागणी होत आहे.

संबंधित कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी समिती स्थापन करावी व संबंधित दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा.

महेश चिवटे, जिल्हाप्रमुख शिवसेना (शिंदे गट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page