October 9, 2026

करमाळा तालुक्यातील जेष्ठ नेते विलासराव पाटील यांचे निधन

0
IMG_20230818_191047.jpg

करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील झरे येथील श्रीराम उर्फ विलासराव आनंदराव पाटील (वय-94) यांचे सायंकाळी चारच्या सुमारास वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.

त्यांच्यावर उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या नागाई वस्ती पोफळज रोडयेथील मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे.

विलासराव पाटील हे झरे सोसायटीचे माजी चेअरमन, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक, पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच मार्केट कमिटीचे माजी व्हाईस चेअरमन होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page