17/12/2024

मिरगव्हाण येथील ॲट्रॉसिटी व विनयभंग प्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

0
IMG-20221210-WA0012-2-2.jpg

सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील व अॕड प्रमोद जाधव यांनी काम पाहिले.

करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-
मिरगव्हाण येथील ॲट्रॉसिटी व विनयभंग प्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर झाला आहे.

यात हकीकत अशी की, मिरगव्हाण येथील एका महिलेचा विनयभंग करून तिला जातीवाचक शिववाळ केल्याप्रकरणी बाळू बबन गोयेकर, राजेंद्र बापूराव गोयेकर, रविंद्र गोयेकर, बायडाबाई गोयेकर व बापूराव गोयेकर यांच्याविरुद्ध भादवि कलम 354 354 504 506 34 आणि अनुसूचित जाती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तीन प्रमाणे करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी बाळू बबन गोयेकर, राजेंद्र गोयेकर व बापूराव गोयेकर यांना अटक करण्यात आली होती. तद्नंतर यातील आरोपींनी अॕड निखिल पाटील व ॲड प्रमोद जाधव यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन मिळणे कामी धाव घेतली होती. याप्रकरणी जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री जे.सी.जगदाळे यांच्यासमोर झाली.

यावेळी वकिलांनी त्यांचे युक्तीवादात फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये पूर्वीचा वाद असून एकमेका विरोधात तक्रारी अर्ज दाखल आहेत त्यामुळे यातील आरोपींना खोटेपणाने सदर केस मध्ये गुंतविण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला तसेच आरोपी हे तपास कार्यात मदत करण्यास तयार असून अटी व शर्तीवर जामीन मंजूर करण्यास विनंती केली या प्रकरणी बाळू गोयेकर, राजेंद्र गोयेकर, बाबुराव गोयेकर यांना पन्नास हजार रुपयांच्या जात मुचलक्याच्या जामीनावर मुक्त करण्यात आले तर बायडाबाई बापू गोयेकर व रवींद्र बापूराव गोयेकर यांची अटकपूर्व जामीनावर मुक्तता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page