श्री कमलाभवानी मातेच्या दर्शनाचा मार्ग अजूनही खडतर ; प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे- भाजपा व्यापारी आघाडीचे जितेश कटारिया यांची मागणी


करमाळा, दि. 15 (करमाळा-LIVE)-
उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवला सुरुवात होत असून, करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी मातेचा उत्सव नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
परंतु सध्या प्रशासनाकडून आयडीबीआय (IDBI) बँक ते श्रीदेवीचा माळ या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यातील काही भाग पूर्ण झालेला आहे. सदरील रस्ता चांगला झाल्यामुळे या रस्त्यावर वाहने प्रचंड वेगाने येतात त्यामुळे आतापर्यंत खूप लहान मोठे अपघात झालेले आहे. या उत्सवात करमाळा तालुक्यासह बाहेरील राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्तांची आई कमालभवानी च्या दर्शनासाठी रीघ लागलेली असते. या नऊ दिवसात अनेक भाविक भक्त पहाटे पासूनच चालत दर्शनासाठी येत असतात.
परंतु तयार झालेल्या रस्त्यावर वाहतुक नियमाचे कोणतेही फलक तसेच वेगाने जाणाऱ्या वाहनांना चा वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक ची आवश्यकता आहे अन्यथा एखादी मोठी घटना घडू शकते तसेच या रस्त्यावर आयडीबीआय (IDBI) बँक समोरील नाल्यावर संरक्षक कठडे नसल्यामुळे देखील अपघात घडू शकतो तरी प्रशासनाने त्वरित या गोष्टीची दखल घेऊन नवीन रस्त्यावर गतिरोधक, पुलाला संरक्षक कठडे आणि ज्या भागातील रस्त्याचे काम बाकी आहे तेथील खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी केली आहे.
- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

