केत्तूर : सर्वांना विचारात घेऊन निवडणूक बिनविरोध करावी- अॕड बाळासाहेब जरांडे

केत्तूर, दि. 13 (करमाळा-LIVE)-
केत्तूर ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांना विचारात घेऊन निवडणूक बिनविरोध करावी असे मत माजी उपसरपंच अॕड बाळासाहेब जरांडे यांनी व्यक्त केले आहे.
केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करावा. बिनविरोध निवडणूकसाठी माझा पाठिंबा असून केत्तूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास शासनस्तरावरील विविध योजनांचा गावास लाभ मिळेल. ज्या लोकांनी निवडणूक बिनविरोध साठी पुढाकार घेतला आहे त्यांनी सर्वांना विचार घेऊन निवडणूक बिनविरोध करणे साठी पुढाकार घ्यावा.वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीने केत्तूर गावचा विकास हा केंद्र बिंदू मानून निवडणूक बिनविरोध करावी. मिटींग मध्ये सर्वांना बोलवण्यात यावे मिटींग सार्वजनिक ठिकाणी असावी असे अॕड जरांडे यांनी सांगितले.


- करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान
- कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न
- भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न
- उजनी बॕकवॉटर परिसरात चोरांचा धुमाकूळ ; दिवेगव्हाण येथे मोटारीच्या तांब्याच्या तारा चोरीला- प्रशासनाचे दुर्लक्ष
- करमाळा : गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची आजपासून व्याख्यानमाला
