मराठा आरक्षणासाठी शेटफळकरांचा एल्गार ; मराठा समाजाच्या वतीने कँडल मार्च



चिखलठाण, दि. 1 (करमाळा-LIVE)-
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ शेटफळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित कॅंन्डल मार्च काढण्यात आला.
यावेळी सर्व समाजातील मंडळींचा सहभाग होता. मराठा समाजाला कुणबी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्यासह महाराष्ट्रात याच मागणीसाठी ठिक ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणाला बसलेल्या सर्वांच्या समर्थनार्थ शेटफळ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ३१ आॕक्टोबर मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजता कॅंडल मार्च काढण्यात आला क्षत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्मारकापासून निघालेल्या या मार्चमध्ये मोठ्या संख्येने लहान मुले, महिलांसह तरूण व वृद्धांचा समावेश होता.
नागनाथ मंदिर, ग्रामपंचायत कार्यालयात कडून संपूर्ण गावात फेरी मारण्यात आली ‘ एक मराठा लाख मराठा ‘अरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ‘जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है’या घोषणांनी परिसर दुमदुमूला.
संध्याराणी लबडे या शालेय विद्यार्थ्यांनीच्या जोशपूर्ण भाषणाने मार्चचा समारोप झाला या मार्चमध्ये गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सह सर्व सदस्य, गावातील सर्व तरूण मंडळाचे कार्यकर्ते व सर्वसमाजातील लोकांचा सहभाग होता.
- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

