जेऊर ग्रामपंचायत निवडणूक : प्रचार अंतिम टप्प्यात ; दोन्ही गटाचा होम टू होम प्रचारावर जोर


जेऊर, दि. 2 (करमाळा-LIVE)-
जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारंपारिक पाटील गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये दुरंगी लढत होत आहे.
15 सदस्य संख्या असलेल्या “जेऊर ग्रामपंचायतीसाठी दुरंगी लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी 15 जागांसाठी 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. त्यामुळे ही निवडणूक पारंपारिक पाटील-शिंदे गटात दुरंगी लढत होणार आहे.
सरपंचपदासाठी तिरंगी लढत
जेऊर ग्रामपंचायतच्या इतिहासात आता दुसऱ्यांदा जनतेतून सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे जेऊर ग्रामपंचायतचे सरपंचपद ओबीसी साठी राखीव असून यासाठी तिरंगी लढत होणार असून पाटील गटांकडून पृथ्वीराज पाटील, शिंदे गटांकडून नितीन खटके तर अपक्ष म्हणून बाळासाहेब कर्चे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
दरम्यान प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असून पाटील गट तसेच शिंदे गट या दोन्हीही गटांनी होम टू होम प्रचारावर जोर दिलेला आहे. सोशल मिडीया, व्हट्सअप स्टेटस, फेसबुक, इंस्टाग्राम, आदींचा देखील प्रचारासाठी वापर केला जात आहे. उद्या शुक्रवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून रविवारी 5 नोव्हेंबरला मतदान तर सोमवारी 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
पुढीलप्रमाणे निवडणूक होणार होत आहे-
प्रभाग क्रमांक- 1
1) धनंजय शिरस्कर (पाटील गट) ❌ आदिनाथ माने (शिंदे गट)
2) नागेश झांजुर्णे (पाटील गट) ❌ अमर गादिया (शिंदे गट)
3) उषा गरड (पाटील गट) ❌ प्रिती लोंढे (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक-2
1) शुभम कोठावळे (पाटील गट) ❌ अतुल निर्मळ (शिंदे गट)
2) शिवांजली कर्णवर (पाटील गट) ❌ कांचन शिरसकर
3) सागर भगत (पाटील गट) ❌ निकील मोरे (शिंदे गट)
प्रभाग क्रमांक-3
1) मालन निमगिरे (पाटील गट) ❌शितल गादिया (शिंदे गट)
2) शबाना पठाण (पाटील गट) ❌ प्रियंका गावडे (शिंदे गट)
3) उमेश मोहिते (पाटील गट) ❌ महेश कांडेकर (शिंदे गट)
(टीप- या प्रभागात दोन जागा सर्वसाधारण महिला असल्यामुळे 1 आणि 3 नंबर मध्ये लढत वेगवेगळी असू शकते.)
प्रभाग क्रमांक-4
1) ओंकार कांडेकर (पाटील गट) ❌ बालाजी गावडे (शिंदे गट)
2) अलsका किरवे (पाटील गट)❌ पुनम कदम (शिंदे गट)
3) प्रियांका निर्मळ (पाटील गट) ❌ प्रिती लोंढे (शिंदे गट)
(टीप- या प्रभागात दोन जागा सर्वसाधारण महिला असल्यामुळे 2 आणि 3 नंबर मध्ये लढत वेगवेगळी असू शकते.)
प्रभाग क्रमांक- 5
1) संदीप कोठारी (पाटील गट) ❌ अभयराज लुंकड (शिंदे गट)
2) समिरा दोशी (पाटील गट) ❌ धनश्री पाथ्रुडकर (शिंदे गट)
3) रोहिणी सुतार (पाटील गट) ❌ कांचन शिरसकर (शिंदे गट)
- महाराष्ट्र पक्षीमित्र, यशकल्याणी नेचर काँझर्वेशन व बागल विद्यालय कुंभेजचे ‘पक्षी वाचवा अभियान’- विद्यार्थ्यांनी उभारले १३७ पक्षी-पाणवठे
- महाराष्ट्र पक्षीमित्र, यशकल्याणी नेचर काँझर्वेशन व बागल विद्यालय कुंभेजचे ‘पक्षी वाचवा अभियान’- विद्यार्थ्यांनी उभारले १३७ पक्षी-पाणवठे
- राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने प्रा. बाळकृष्ण लावंड सन्मानित
- वन्यजीवांसाठी ‘जलदूत’ बनले सातव बंधू ; सौरभआणि माऊली यांच्याकडून वनक्षेत्रालगतच्या पाणवठ्यात नियमित पाणीपुरवठा
- जेऊरवाडी येथील योगेश निमगिरे यांचे आकस्मिक निधन ; जेऊर परिसरात शोककळा


