हिसरे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कैलास ननवरे यांची निवड

करमाळा, दि. 12 (करमाळा-LIVE)-हिसरे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कैलास ननवरे यांची निवड करण्यात आली आहे.
हिसरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीची आज निवड घेण्यात आली. ही निवड अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये गावातील बहुसंख्य पालक उपस्थितीत होते. सर्वांच्या विचाराने एकमताने अध्यक्ष म्हणून कैलास ननवरे यांची तर उपाध्यक्ष पदी रेखा सातपुते यांची निवड करण्यात आली.
तर सदस्य म्हणून विविध प्रवर्गाच्या पालकांची निवडी करण्यात आल्या. हनुमंत पवार, राधिका किरण जगदाळे, राजेश रुद्राक्षे, मंदा पोपट ठोंबरे, अनिल हजारे, सुप्रिया हरी काळे, यास्मिन ताजुद्दिन शेख यांची सदस्य म्हणून तर शिक्षण तज्ञ म्हणून निसार दस्तगीर व शिक्षक प्रतिनिधी संतोष कुंभार यांची निवड करण्यात आली.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मोमीन सर व सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. यावेळी बाळासाहेब पवार, सरपंच शिवाजी ठोंबरे, सरपंच विकास ननवरे, सदस्य मोहन जगदाळे तसेच गावातील नागरिक, विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीनंतर माजी अध्यक्ष अनिल हजारे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास ननवरे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


- दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण
- करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’
- ३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन
- केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर
