राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत पुणे संघ प्रथम ; जेऊरच्या नूतन हँडबॉल असोसिएशनच्या साक्षी कुदळे ची चमकदार कामगिरी

जेऊर, दि. 12 (करमाळा-LIVE)-
अमरवती येथे झालेल्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत पुणे संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून यामध्ये जेऊर येथील नूतन हँडबॉल असोसिएशनची साक्षी नागनाथ कुदळे हिने चमकदार कामगिरी केली आहे.

नुकत्याच अमरावती धामणगावं येथे 41 वी हँण्डबॉल ज्युनिअर राज्यस्तरीय मुली स्पर्धा दि 9 ते 11 डिसेंबर रोजी पार पाडली. या झालेल्या स्पर्धेमध्ये पुणे संघाचा प्रथम क्रमांक आला आहे. यामध्ये जेऊर येथील नूतन हँडबॉल असोसिएशनच्या साक्षी कुदळे हिने चमकदार कामगिरी केलेली आहे. कु. साक्षी हिला नूतन हँडबॉल असोसिएशनचे सचिव विनोद गरड यांचे मार्गदर्शन लाभले. चमकदार कामगिरी बद्दल कु. साक्षी हीचे कौतुक सर्वत्र होत आहे.
या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील, माजी सभापती अतुल पाटील, भारत शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. अर्जून सरक, नूतन सरपंच पृथ्वीराज पाटील, उपसरपंच नागेश झांजुर्णे, नूतन हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष नुस्ते, उपाध्यक्ष नौशाद जहागीरदार यांनी अभिनंदन केले आहे.



- नशामुक्त भारत अभियान अंतर्गत कुंभेजच्या बागल विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सावडीचा वैभव ठोंबरे-पाटील झाला पोलीस उपनिरिक्षक
- ३६ विद्यार्थी आणि संशोधकांसह विविध क्षेत्रांतील १५ समाजदीपांचा रविवारी करमाळ्यात गौरव
- इंग्रजी वक्तृत्वातून सोलापूरच्या ग्रामीण प्रतिभेला मिळेल जागतिक व्यासपीठ- डॉ. प्रचिती पुंडे
- कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन
