पाथुर्डी येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन


करमाळा, दि. 16 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे श्री सद्गुरु संत बाळू मामा मूर्ती स्थापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. 17 डिसेंबर ते मंगळवार दि.19 डिसेंबर कालावधीत सप्ताह संपन्न होणार आहे. या सप्ताहानिमित्त काकडा आरती, अमृतनुभव पारायण, हरिपाठ, भोजन, हरिकिर्तन, हरिजागर हे दैनंदिन कार्यक्रम असणार आहेत.
रविवारी ह.भ.प अक्षय महाराज शेळके यांचे किर्तन संध्याकाळी 8 ते 10 या वेळेत होणार असून सोमवारी ह.भ.प. जालिंदर महाराज वाघमोडे यांचे संध्याकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत कीर्तन होणार आहे. तर मंगळवारी ह.भ.प. विठ्ठल महाराज गहिनीनाथगड यांचे सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन नंतर मूर्तीवर पुष्पवर्षाव व आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन पाथुर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. समस्त ग्रामस्थ पाथुर्डी यांच्यावतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.


- दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण
- करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’
- ३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन
- केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर
