राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा संभाजी ब्रिगेडच्यावतीने सत्कार ; विविध मागण्यांचे दिले निवेदन



करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा संभाजी ब्रिगेडच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये केळी पिकांचा समावेश करण्यात यावा तसेच शेलगावं (वांगी) येथे कृषी संशोधन केंद्र उभारण्यात यावे या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुहास पोळ, जेऊर तालुकाध्यक्ष अतुल निर्मळ, विकास गुंड, दादासाहेब लबडे, पांडुरंग लबडे, महादेव गुंड, राजेंद्र पोळ, सचिन पोळ, तुकाराम चोरगे, प्रदिप पोळ, अर्जुन नाईकनवरे, किरण पोळ आदी उपस्थित होते.
- वैष्णवी, सुचिता अन् रोहित यांची पोलिस दलात निवड ; तिघांचा कुंभेज येथे सन्मान
- श्री.वटवृक्ष मंदिरात स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन
- जेऊर येथे महिला दिन उत्साहात साजरा ; ‘हिरकणी’ स्पर्धेत अपेक्षा अवसरे यांचा प्रथम क्रमांक
- अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबीर संपन्न
- आवाटी येथे सोमवारी हजरत बु ‘अलीशाह कलंदर रह पानीपत’ यांच्या स्मरणार्थ ‘उर्स कलंदर’ कार्यक्रमाचे आयोजन



