17/12/2024

शेटफळ येथे वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णकृती मुर्तींचे वाटप

0
IMG-20240303-WA0011.jpg

चिखलठाण, दि. ३ (करमाळा-LIVE)-
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मुलगा व वडीलांच्या वाढदिवसानिमित्त शेटफळ येथील डॉ सुहास लबडे यांच्याकडून उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती मुर्ती भेट दिली आहे.

शेटफळ येथील डॉ सुहास लबडे यांचा मुलगा राघवेंद्र याचा प्रथम व वडील विलास लबडे यांचा पासष्ट वा वाढदिवस एकाच दिवशी आहे हे अवचित्य साधत डॉ लबडे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येक कुटूंबात एक या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती मुर्ती भेट देऊन सन्मानित केले आहे.

याबाबत बोलताना डॉ लबडे म्हणाले की, वाढदिवसानिमित्त आपले स्नेही जन शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आपल्याकडे येत असतात अशावेळी त्यांना आपल्या कुटुंबाकडून काहीतरी भेट द्यावी अशी माझी इच्छा होती माझी पत्नी डॉ अमृता लबडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत आहे त्यांची पूजा केवळ शिवजयंती दिवशी न करता ती दररोज व्हावी घराघरात व्हावी यासाठी या शिवजयंती सप्ताहात राजांची मूर्ती भेट द्यावी अशी कल्पना सुचवली आम्हा सर्वांनाच ती योग्य वाटली यानुसार यावेळी उपस्थित असलेल्या लोकांना प्रत्येक कुटुंबात एक याप्रमाणे महाराजांच्या मूर्ती भेट दिल्या एवढ्या रकमेचे एखादी दुसरी वस्तू भेट दिली असती तरी घेणारा आला आणि देणारा लाही एवढा आनंद झाला नसता परंतु महाराजांची मूर्ती बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जो आनंद होता. तो आम्हाला फार महत्त्वाचा वाटला.

डॉ. लबडे यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे या परिसरातील लोकांकडून कौतुक होत असून इतर वेळी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून अशा स्वरूपाचा भेट देण्याचा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थित शिवभक्त प्रशांत नाईकनवरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page