खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर ; शेलगाव (वां) येथे जल्लोष


जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)-
भाजपचे माढा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शेलगावं येथे फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून व घोषणा देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी गाव चलो अभियान जिल्हा संयोजक पिक विमा तक्रार निवारण समिती सदस्य लक्ष्मण केकान, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर साळुंखे, माजी ग्रामपंचायत सदस्य युवराज काळे पाटील तसेच पंचक्रोशीतले असंख्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री केकान यांनी मत व्यक्त करताना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे प्रचंड बहुमताने विजय होणार आहेत तसेच ह्या विजयामध्ये करमाळा तालुक्याचा सिंहाचा वाटा असेल तसेच करमाळा तालुक्यातील पाण्याची प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील या सर्व या प्रश्नावरती खासदार निंबाळकर यांनी गांभीर्याने विचार करून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विजयामध्ये करमाळा तालुक्याचा सिंहाचा वाटा असेल असे मत श्री केकान यांनी व्यक्त केले.


