जेऊर : हरंगुळ-पुणे एक्सप्रेस मध्ये आढळला बेवारस मृतदेह

जेऊर, दि. २० (करमाळा-LIVE)-
हरंगुळ-पुणे एक्सप्रेस मध्ये बेवारस पुरूषाचा मृतदेह सापडला आहे.
काल दि. १९ मार्च रोजी संध्याकाळी हरंगुळ-पुणे एक्सप्रेस मध्ये जेऊर स्टेशन येथे अपंग डब्यात बेवारस पुरूषाचा मृतदेह गाडी जेऊर रेल्वे स्टेशनवर आल्यावर आढळला. सदरील बेवारस मृतदेहाचे पंचनामा केला असता, त्याला काहीतरी शारीरिक आजार होता असे प्राथमिक तपासणीत आढळून आले. सदरील मृतदेह प्रथम जेऊर स्टेशन मास्तर यांनी पाहिला. मृतदेहाचे पंचनामा दत्ता लोंढे आणि शालीवान निमगिरे यांनी केला तर पुढील तपास पोलीस हवलदार भाऊसाहेब लोंढे करीत आहेत.




