08/06/2025

जेऊरचे ग्रामीण रूग्णालय पंधरा दिवसांपासून अंधारात ; सहा लाख रूपयांची वीज बील थकीत- संभाजी ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

0
IMG-20240403-WA0023.jpg

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-
‌जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या पंधरा दिवसापासून अंधारात असून वीज बिल थकीतेमुळे लाईट कनेक्शन कट करण्यात आले आहे, वरित लाईट कनेक्शन न जोडल्यास संभाजी ब्रिगेड तर्फे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा जेऊर शहर अध्यक्ष अतुल निर्मळ यांनी दिला आहे.

जेऊर ग्रामीण रुग्णालयात अंदाधुंद कारभार चालू आहे. प्रशासनाने दखल घेऊन त्वरित लाईट बील भरावे महाराष्ट्राचे आरोग्य तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील असून गावापासल्या जवळील तालुक्यात अशी परिस्थिती असेल तर महाराष्ट्रात आरोग्य विभागाची काय परिस्थिती असेल. तसेच जेऊर येथे त्यांचा शासकीय दौरा होऊन जातात जेऊर येथील ग्रामीण रुग्णालयाची लाईट गुल जेऊर हे करमाळा तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून ग्रामीण भागातील लोकांची ये जा मोठ्या प्रमाणात असून जर रात्रीच्या वेळेस उपचार होऊ शकत नाही. व दिवसा लाईट नसल्यामुळे औषधांचा साठा खराब होऊन गेला असेल. तसेच वीज बिलाची रक्कम 585400 रुपये एवढा आहे.

थकीत वीज बील

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page