सोगावच्या जि.प शाळेचे शिक्षक रविंद्र पवळ आदर्श पुरस्काराने सन्मानीत



करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-
सोगावच्या जि.प शाळेचे शिक्षक रविंद्र पवळ आदर्श पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
बुधवार दि. ३ एप्रिल रोजी करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान समारंभ करमाळा येथे संपन्न झाला.
सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर, करमाळा गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, विस्तार अधिकारी सुग्रीव नीळ, विस्तार अधिकारी नितीन कदम तसेच सर्व केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांचे उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
शैक्षणिक गुणवत्ता व शालेय, सहशालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा उपलब्धतेस समाज सहभाग मिळविणाऱ्या गुरूजणांचा यावेळी गौरव करण्यात आला.
जि.प. शाळा सोगावचे रविंद्र पवळ यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा सन्मान समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या बद्दल पूस्कारप्राप्त आदर्श शिक्षक रविंद्र पवळ यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.



