06/06/2025

सालसे येथील लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

0
IMG-20240719-WA0003.jpg

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)-
न्यू यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री विद्यालयातील २०२३-२०२४ या वर्षातील इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

संस्थेचे सचिव रविंद्र सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यापीठावर संस्थेच्या उपाध्यक्ष मनिषा तनपूरे, संचालक अनिल घाडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तानाजी लोकरे, सतिश रुपनवर, शरद पवार, लहू येवले, वैभव घाडगे आदी उपस्थित होते.

यावेळी गुणवंत विद्यार्थी समृद्धी रामप्रभू गोंडगिरे (९४.४०%), आर्यन विठ्ठल हांडे (९३.६०%), पायल देवेंद्रनाथ वायकुळे (९२.४०%) या प्रथम तीन क्रमांक आलेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर इयत्ता आठवी मधील एनएमएमएस परीक्षेमधील सारथी शिष्यवृत्ती मिळविलेल्या करण रोकडे, शिवराज गात, शुभम हांडे, अश्विनी बाबर, समाधान सालगुडे, श्रुती रोकडे यांनाही सन्मानित केले या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमासाठी सालसे पंचकृषितील मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घाडगे सर यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page