आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून जिंती-कावळवाडी-रामवाडी रस्त्याला निधी मंजूर ; इतरांनी श्रेय लाटू नये- माजी सरपंच अनिल शेजाळ

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जिंती-कावळवाडी-रामवाडी या रस्त्यासाठी आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रय्नामुळे ११.२० कोटी रूपये मंजूर झाले असून याचे श्रेय इतरांनी लाटू नये असे मत कावळवाडीचे माजी सरपंच अनिल शेजाळ यांनी व्यक्त केले आहे.
जिंती-कावळवाडी-रामवाडी या रस्ता मंजूर होण्याची चाहूल लागताच या रस्त्याचा पाठपुरावा करण्याऐवजी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान लोकसभा निवडणूकीत प्रचार करिता कावळवाडी येथे आमदार संजयमामा शिंदे आले असता त्यांच्याकडे कावळवाडी गावचे माजी सरपंच अनिल शेजाळ यांनी मागणी केली होती आणि आमदार संजयमामांनी लवकरच काम मंजूर करू अशी माहिती दिली होती.
या रस्त्यामुळे १० ते १२ गावांचा प्रश्न मार्गी लागला आहे आणि कावळवाडी गावचे माजी सरपंच अनिल शेजाळ यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.