06/06/2025

उजनी पट्ट्यातील केडगावं येथील आजी-माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश ; माजी आमदार नारायण आबा पाटील यांची उपस्थिती

0
IMG-20240725-WA0032.jpg

जेऊर, दि. २५ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील केडगावं येथील आजी-माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आज माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.

उजनी पट्ट्यातील केडगावं हे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. यामुळे या गावातील महत्वाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळाली आहे. यावेळी माजी सरपंच सचिन बोराडे, माजी उपसरपंच शिवाजी बोराडे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम दगडू साळुंखे, वैभव बोराडे, संतोष मस्तुद, नितीन डोके, देविदास फडतरे, सागर बोराडे, आप्पा बोराडे, गंगाराम शिनगारे, अरुण बोराडे, तुकाराम पाटील, गणेश गुटाळ, सतिश बोराडे, शिवाजी बोराडे, समाधान शिनगारे, पांडुरंग फडतरे, दशरथ बोराडे, प्रवीण खोलासे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात श्री पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.

या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत आणि सत्कार समारंभ जेऊर येथील माजी आमदार कार्यालयात पार पडला. यावेळी आदिनाथचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, माजी सभापती अतुल पाटील, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोठारी, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड, कैलास बोन्द्रे, तालुका आरोग्य समितीचे माजी सदस्य अॕड विजय कोकरे, लोकनेते नारायण आबा पाटील मित्र मंडळ शाखा केडगावं चे अध्यक्ष पोपट राव लगस, हनुमंत भगत, मंगेश बोन्द्रे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद गरड यांनी केले. यावेळी सचिन बोराडे व नितीन डोळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. सोशल मीडिया तालुकाप्रमुख संजय फडतरे यांनी आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page