10/06/2026

जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा मनमानी कारभार ; कर्मचाऱ्यांचे सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण

0
IMG-20240729-WA0024.jpg

जेऊर, दि. २९ (करमाळा-LIVE)– जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्यामुळे न्याय मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक पी.व्ही सरडे आणि आरोग्य सेविका श्रीमती आर.वाय सय्यद या कर्मचाऱ्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ रत्नदीप टोपे यांनी मनमानीपणे व अन्यायकारक आणि नियमबाह्य सेवा पुस्तकात नोंदी घेणे, सेवा संपुष्टात आणण्याची धमकी देणे. मनमानी पणे वेतन कपात करणे, तहकूब ठेवणे तसेच आर्थिक नुकसान करणे. मासिक सभेमध्ये अपशब्द बोलणे, वरिष्ठांना व संबंधितांना न कळवणे. फरकाची रक्कम अदा न करणे, अशा अनेक अन्यायकारक घटना घडत असल्यामुळे आम्ही आमरण उपोषण करीत आहे असे निवेदनात म्हटले आहे. तरी वरिष्ठाकडून न्याय मिळावा असे निवेदन यावेळी श्री सरडे आणि श्रीमती सय्यद यांनी दिले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page