07/06/2025

कर्मयोगी व्याख्यानमाला : २२ आॕगस्टला पत्रकार संजय आवटे यांचे तर २३ आॕगस्टला न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांची व्याख्याने होणार

0
IMG_20240821_165202.jpg

जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)-
लोकनेते माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १४ वर्षे जेऊर येथील भारत महाविद्यालयाच्यावतीने आयोजित केली जाणारी कर्मयोगी व्याख्यानमाला यावर्षी २२ व २३ ऑगस्ट या दोन दिवशी संपन्न होत आहे.

या व्याख्यानमालेमध्ये गुरूवारी २२ ऑगस्टला सकाळी दहा वाजता प्रख्यात वक्ते व दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांचे महाराष्ट्राचा नाद नाय करायचा ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

तर शुक्रवारी २३ ऑगस्टला दुपारी दोन वाजता थोर विचारवंत व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांचे ‘भारतीय संविधान व आजचे वास्तव’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

२३ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानास व माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसाच्या समारंभास माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील हे महाराष्ट्रातील तीन महत्त्वाचे युवानेते उपस्थित राहणार आहेत.

शिव-शाहू, फुले- आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेला पुढे घेऊन जाणाऱ्या व परिवर्तनवादी विचारांना बळ देणाऱ्या या व्याख्यानमालेतील दोन्ही व्याख्यानांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या व्याख्यानमालेचे प्रमुख प्रा. डॉ. संजय चौधरी व भारत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page