08/06/2025

नारायण आबा ; “माझ्या जीवनात मला भेटलेले एक आदर्श नेतृत्व”

0
IMG_20240823_102230.jpg

जेऊर, दि. २३ (करमाळा-LIVE)-
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार नारायण आबा पाटील यांचा आज २३ ऑगस्टला वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त पाटील गटाचे सोशल मिडीया तालुकाप्रमुख संजय फरतडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

संजय फरतडे यांनी व्यक्त केलेले मत पुढीलप्रमाणे-

एखाद्या मतदारसंघाचा नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण जर बघायचं झालं तर नक्कीच डोळ्यासमोर माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे नाव आल्याशिवाय राहणार नाही. आजच्या युगामध्ये प्रत्येकालाच एक आदर्श नेता असावा आणि हा नेता शोधण्यासाठी प्रत्येक जण एखाद्या आदर्श नेत्याचा शोध घेत असतो. स्वामी विवेकानंद यांच्या भाषेमध्ये जर बघितलं तर खरा नेता कोण ज्याला आज्ञा ऐकता येते तोच आज्ञा देऊ शकतो.

नेतृत्व स्वीकारला एवढं सोपं नाही नेत्याला दासांचा दास व्हावं लागतं. समाजाबद्दल असलेली आपुलकी व युवा कार्यकर्त्यांबद्दल असलेले प्रेम,सामाजिक बांधिलकी, ज्येष्ठांचा आदर या सर्वांना बरोबर घेऊन जाणार नेतृत्व म्हणजेच माजी आमदार नारायण आबा पाटील.

अगदी सरपंच पदापासून ते आमदार पदापर्यंत मजल मारलेलं नेतृत्व नारायण आबा पाटील २०१४ ते २०१९ मध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार होऊन न भूतो न भविष्य अशी केलेली विकास कामे जी कामे काल ही कोणाला जमली नाहीत आणि भविष्यातही कोणी करू शकणार नाही मग ते पश्चिम भागातील रस्ते, मोठमोठे नदीवरील पूल असो, पूर्व भागातील दहीगाव उपसा सिंचन योजना असो,रिटेवाडी सारखी उपसा सिंचन योजना असो, धरणग्रस्तांसाठी मंजूर केलेल्या नागरी सुविधा असो, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेली लाईट असो, विद्यार्थ्यासाठी रोजगार असोत या सर्व कामांचा एकच जनक म्हटलं तरी माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे नाव कुठेच पाठीमागे राहणार नाही.

संघटनेच्या मोठ-मोठ्या योजना आखणे सोपे आहे पण भिन्न स्वभावाच्या लोकांना त्यांच्यातील अंतरिक एकतेला आव्हान करून एका माळेत गुंफून आणणे यातच नेत्याची खरी कसोटी असते. नेतृत्व स्वीकारणं मोठं कठीण आहे.हजारो लोकांची मने सांभाळावी लागतात. जो अंतकरणापासून सगळ्यांचा होऊ शकतो तोच खरा नेता,नेत्याजवळ स्वार्थ आणि मत्सल याचा अंशही असता कामा नये ज्या नेत्याकडे स्वार्थ आणि मत्सल असतो असा व्यक्ती कधीही नेता होऊ शकत नाही. जन्मताच गुण आणि निस्वार्थी बुद्धी यातूनच नेत्याचे नेतृत्व घडतं.

असा सर्व गुण संपन्न मला भेटलेला माझा जीवनातील नेतृत्व हे माजी आमदार नारायण आबा पाटील हे होय. क्षेत्र कोणतेही असो ते गाजवणारच मग तो राजकारणाचा फड असो अथवा कुस्त्यांचा फड असो.राजकारण म्हटलं की हार जीत आलीच २०१४ ला जनतेच्या सहकार्याने नारायण आबा पाटील हे आमदार झाले परंतु आमदार काय असतो व आमदार काय काम करतो हे मतदार संघातील जनतेला दिसलेलं हे एक आगळ-वेगळं चित्र खरंच आज पर्यंत एवढी मंडळी राजकारणात आली कुणी आमदार झालं,कुणी सभापती झालं,कुणी खासदार झालं.पण नारायण आबा पाटील यांच्या सारखा आमदार आम्ही कधीच बघितला नाही.त्यांच्या दरबारी गेलेला आजपर्यंत कोणताच कार्यकर्ता मोकळ्या हाताने परत आलेला मी कधी बघितला नाही.त्या कार्यकर्त्यांची केलेली विचारपूस त्याच्या सोडवलेल्या आडी-अडचणी,समस्या त्याच्या गावासाठी दिलेला विकास निधी तो कार्यकर्ता ही कधी विसरला नाही. सर्वसामान्य माणसांना वाटणार हे आपलंस नेतृत्व आणि आज त्या नेतृत्वाचा वाढदिवस म्हणजेच आपल्या आयुष्यातील काही क्षण या नेतृत्वाच्या चरणी अर्पण केला तरी काही वावग ठरणार नाही.

जन्म द्यावा त्या माता-माऊलीन, शिक्षण द्यावं त्या गुरुजनान आणि नेतृत्व द्यावं नारायण आबा पाटील यांनी अशा नेतृत्वाबरोबर राहणं हे सुद्धा भाग्यच असतं अशा ह्या महान नेतृत्वाला २०२४ ला आमदार होण्यासाठी वाढदिवसाच्या माझ्याकडून लाख-लाख शुभेच्छा..

संजय सुभाष फडतरे,
सोशल मिडिया तालुकाप्रमुख ( पाटील गट)
ग्रामपंचायत सदस्य-पोमलवाडी
मा.आ.नारायण(आबा)पाटील जनसंपर्क कार्यालय-पोमलवाडी (पश्चिम भाग)

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page