पांगरे ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण ; विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप

जेऊर, दि. २५ (करमाळा-LIVE)-
पांगरे ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या आवारामध्ये सरपंच प्रा. डाॅ. विजया दत्तात्रय सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यवेळी प्रत्येक विद्यार्थ्यास एक झाड याप्रमाणे वृक्ष वाटप करण्यात आले. दिलेले झाड स्वतःचे घरासमोर अथवा शेतामध्ये लावून त्याचे संगोपन करण्याचा सल्ला देऊन पुढील वर्षी ते झाड पाहण्यासाठी आम्ही येणार आणि ते झाड चांगल्या पद्धतीने जोपासले असल्यास विद्यार्थ्यांना आणखी झाडे बक्षीस देण्याचे आश्वासन सरपंच यांनी दिले.
यावेळी विद्यार्थ्यांना झाडाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक संजय जाधव, अतुल घोगरे तसेच सर्व शिक्षक त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य महादेव टेकाळे, भैरवनाथ हराळे, विवेक पाटील, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक ॲड. दत्तात्रय सोनवणे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब गुटाळ, सौदागर दोंड, ग्रामसेवक समाधान कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी गोपाळ कोळी, मच्छिंद्र उघडे आदी उपस्थित होते.