भारत शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले सेवक दिलीप राऊत सेवानिवृत्त

जेऊर, दि. २ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत शिक्षण संस्थेतील सेवक राऊत आज सेवानिवृत्त झाले, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेतील व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत (+२) कार्यरत असणारे सेवक दिलीप धोंडिबा राऊत यांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम आज पार पडला. यावेळी त्यांचा सहपत्निक सन्मान करण्यात आला.
यावेळी जेऊरचे सरपंच व संस्थेचे संचालक पृथ्वीराज पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल गादिया, संचालक सदस्य संदिप कोठारी, संचालक सुनील तळेकर व संस्था सचिव प्रा.अर्जुन सरक, प्राचार्य केशव दहिभाते, प्रायमरीचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, उपप्राचार्य एन.डी कांबळे, पर्यवेक्षक बी.एस शिंदे आदी उपस्थित होते.
शांत आणि संयमी स्वभावाचे, किर्तन, भजन याची मनापासून आवड असणारे श्री राऊत हे आज सेवानिवृत्त झाले, त्यांचे उर्वरित आयुष्य सुख समाधान आणि निरोगी जावो अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.