जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूल मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-
जेऊरातील भारत प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त इयत्ता चौथीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षक बनले होते. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपला पेहराव शिक्षकांसारखाच केलेला होता मुलींनी साड्या परिधान केल्या होत्या तर मुलांनी शर्ट पॅन्ट किंवा नेहरू विचार या पद्धतीचा पोशाख करून शिक्षक बनण्याचा आनंद मिळवला.
यावेळी विद्यार्थ्यांनी सुरुवातीला शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले त्यानंतर प्रत्येक प्रत्येक वर्गात जाऊन प्रत्येक विषयाचे अध्यापन केले. विद्यार्थी शिक्षक बनल्यामुळे किंवा आपली मुले शिक्षक बनल्यामुळे पालक आणि विद्यार्थी या सर्वांमध्येच अतिशय उत्साहाचे वातावरण दिसून आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय तयारी पूर्ण अध्यापनाचे काम केले.
यावेळी विद्यार्थ्यांमधून मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक सुरक्षा कमांडो अशा पद्धतीची निवड करण्यात आली होती.