07/06/2025

करमाळ्यात गणपती विसर्जन साठी खाजगी विहीर अधिग्रहन करून द्यावी- युवासेना तालुका समन्वयक कुमार माने यांची मागणी

0
IMG-20240910-WA0003.jpg

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-
पुढच्या आठवड्यात मंगळवारी १७ सप्टेंबरला गणपती विसर्जन असून करमाळा शहरातील सर्व ठिकाणचे घरगुती व सार्वजनिक मंडळाचे गणपती विसर्जन करण्यासाठी नगरपालिका जो विसर्जन कुंड तयार करते ती कुंड न करता प्रांतअधिकाऱ्यांनी नगरपालिकेस करमाळा शहरातील एखादी खाजगी विहीर अधिग्रहण करून देण्यात यावी विसर्जन झाल्यानंतर थोड्या दिवसांनी त्या विहिरीची स्वच्छता नगरपरीषदेकडून करून घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या युवासेनेचे करमाळा तालुका समन्वयक कुमार माने यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

यामुळे नागरिकांच्या भावनाही दुखावल्या जाणार नाही. शहरातील काही मंडळाचे व घरगुती गणपती पाचव्या व सातव्या दिवशी विसर्जन करतात, त्यामुळे लवकरात लवकर विहीर अधिग्रहण करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

या निवेदनावर युवा सेना उपजिल्हा प्रमुख मयुर यादव, तालुका प्रमुख शंभुराजे फरतडे, युवा सेना शहर प्रमुख समीर हलवाई, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, युवा सेना उपशहर प्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव, अनिकेत केंगार, अजय साने, महेश घाडगे, सौरभ माने, अक्षय घाडगे,अविनाश घाडगे, गणेश राखुंडे, शुभम क्षीरसागर, स्वप्निल ननवरे, किशोर पवार यांच्या सह्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page